Thursday, January 14, 2016

On language - a rare long rant in Marathi

माझी काल lectures सुरु झाली आणि आजचा शेवटचा वर्ग होता "bilingualism" वर. वर्गाच्या सुरुवातीलाच ma'am नी विचारलं की तुम्हाला प्रत्येकाला किती भाषा येतात. सर्वांनी सांगितलं. एकूण पाहता निदान ४ तरी भाषा बोलणारे लोक होते. बंगाली, ओडिया, हिंदी, तेलुगु, एक झोंका नावाची भूतान मध्ये बोललेली भाषा, काही जर्मन शिकलेले, काही फ्रेंच, आणि माझी मराठी. म्हणजे काय, तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर नुसतं सोपं नव्हतं तर त्याला भरपूर response मिळाला.

दुसरा question त्यातुलनेत कठीण होता. यांपैकी तुमची मातृभाषा कोणती? खरंतर उत्तर चटकन देता आलं पाहिजे, नाही? आता आमच्या वर्गात असे लोक आहेत जे घरी देखील English वापरतात. पण मी? घरी काय बोलते मी, तर मराठी! पाहिलं बोलायला, ऐकायला, समजायला काय शिकले? मराठी. पण लिहिण्याचा काय?

मातृभाषा, ज्याला linguists L-1 किंवा first language असं म्हणतात, ती फक्त आई-बाबा बोलतात ती भाषा, किंवा समाजाची भाषा नाही. एकदम technical definition देणं, ते पण आपल्या देशाच्या संदर्भात, कठीणच आहे, पण सोपं करून सांगायचं झालं तरी एक concept मात्र समजायला हवी - critical period hypothesis. भाषातज्ञ असं म्हणतात की आयुष्याच्या पहिल्या साधारण ३/५ वर्षांत माणूस जी भाषा शिकतो, ती त्याची first language. त्यानंतर शिकलेल्या कुठल्याही भाषेमध्ये native language proficiency मिळणार नाही. म्हणजे मी पाच वर्षांनंतर शिकलेली कुठलीही भाषा माझी मातृभाषा नाहीच?

तर हे असं कोडं - पहिला बोललेला शब्द मराठी, पण literacy सर्वात आधी कोणत्या भाषेत मिळाली मला? English. मी पहिली लिहायला-वाचायला शिकलेली भाषा. मराठी लिहायला शिकले तेव्हा मी किती, किमान ८-९ वर्षांची असेनच. तोपर्यंत घरच्यांची नक्कल करून, आजी भाजी निवडायला बसली की जमिनीवर पसरलेला कालचा सकाळ "वाचून" एवढं माहिती होतं की आपण हे जे बोलतो ना, ते असं गोलगोल लिहितात, आणि वरून एक रेघ ओढली म्हणजे झालं मराठी. ज्या भाषेत साक्षरता वयाच्या सातव्या वर्षी मिळते(?), ती कसली मातृभाषा.

आजूनही English मध्ये लिहिता-वाचताना जितकं comfortable वाटतं, तितकं मराठी मध्ये मुळीच वाटत नाही. तरी मी आपली स्वतःची समजूत घालते, माझं मराठी त्यामानानी बरंच बरं आहे. माझ्या friends मध्ये बघायला गेलं तर चांगलं आहे म्हणायला हरकत नाही. (आत्ताच्या शुद्धलेखनाच्या चुका मला माफ कारण हा पहिलाच असा मराठी मध्ये type करण्याचा प्रयोग.)

तर माझा point काय आहे? मला वाईट वाटतं का? खरंतर नाही. अर्थात थोडं विनोदी वाटतं, इथे भारतात बसून English माझी मातृभाषा आहे असं जाहीर करायला. ही अशी situation  माझी चूक आहे का? नक्कीच नाही. मी माझ्या समाजाचं पिल्लु आही. माझी मातृभाषा कोणती हे मोठ्या प्रमाणात राष्ट्राच्या policies ठरवतात. भारताबद्दल specifically बोलायचं झालं तर आपला three-language formula for schools आपल्या नकळत आपली प्रत्येक भाषेतील proficiency ठरवतो - मग ती English असो किंवा हिंदी.

लहानपणी विचार केल्याचा आठवतो, अरे ही मराठी medium ची मुलं आपल्यापेक्षा किती वेगळी आहेत. कमी नाही, जास्त नाही, पण वेगळी definitely. ज्या वयात आपलं पूर्ण जग शाळेत जाण्यापूर्त मर्यादित असतं, तेव्हा अख्खा दृष्टीकोन त्या medium मध्ये गुंतलेला असणं तसं स्वाभाविक आहे. थोडं मोठं झाल्यावर, Enid Blyton पासून Harry Potter च्या प्रेमात पडल्यावर, आईला म्हणल्याचं देखील आठवतंय, बरं झालं तुम्ही मला English medium school मध्ये घातलं. आणि तरीही, त्याचवेळी जेव्हा माझ्या मोठ्या बहिणी English TV shows बघायच्या आणि ते accents काही केल्या समजायचे नाहीत तेव्हा कसंतरीच वाटायचं. आपली first language परकी वाटायची.

पुन्हा… मुद्दा काय? Above all की Linguistics शिकायला खूप मज्जा येते. जुनी कोडी सुटतात, अनेकदा नवीन त्याहून मोठे प्रश्न उभे राहतात, पण तेही सोडवायला फार गंमत वाटते. मधे माझ्या डोक्यावर संस्कृत शिकायचं भूत चढलं होतं - शाळेत German निवडल्यानी घालवलेल्या संधीची जणू भरपाई. गेल्या काही वर्षात, mainly Facebook सारख्या ठिकाणी, लोक जेव्हा नियमीतपणे मराठी मधून लिहिताना दिसायचे तेव्हा कसंतरीच व्हायचं. उगीचच संशय यायचा... की हे तत्त्वांचं प्रदर्शन आहे का, माझ्यासारख्या लोकांना वाईट वाटवून द्यायला? परत, वेगळ्या way नी, स्वतःच्याच भाषेत परकं वाटायचं.

पण जशी मी German, काही प्रमाणात English, शिकवायला लागले, तसे भाषेविषयी असलेले बरेच गैरसमज दूर होत गेले. Hyderabad ला येउन, भाषाशास्त्राच्या पूर्णपणे प्रेमात पडून लक्षात आलं की हे good English, bad English, शुद्ध मराठी, शुद्धलेखन, योग्य-अयोग्य उच्चार, व्याक्रण… हे किती वरवरचं असतं. भाषा म्हणजे तेवढंच नाही. भाषा लवचिक आहे. ती जणू वाहते आणि आपण तिला हवा तसा आकार देऊ शकतो.

भाषेची enjoyment यातून घेता येते की मी एकाच व्यक्तीशी बोलताना एकाच वाक्यात चार निरनिराळ्या भाषांमधले words अगदी easily interchangeably इस्तेमाल करू शकते. त्यात काही कमीपणा नाही. कारण भाषांची अशी खिचडी करणं माझ्या मेंदूला छान जमतं आणि ऐकणार्याला पण नीट समजतं.  Linguists नी याला code-mixing किंवा code-switching असं नाव दिलं अहे. या अशा ना धड मराठी ना English भाषेला interlanguage म्हणायला हरकत नाही. खास bilinguals साठी चा हा शब्द.

प्रत्यक्षात आपण जन्माला येतो तेव्हा आपल्या मेंदूची तय्यारीच असते वाट्टेल तेवढ्या भाषा शिकायची. Scientifically speaking, त्यांच्याशी खेळायची. आणि जर आपल्या brain ला आपल्या चार मातृभाषा process करण्यात काही problem नाही, तर आपण का बिचकतो हे म्हणताना की my mother tongues are English and… 

No comments:

Post a Comment